बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

started new Blog.

18/4/2016.

I have started new Blog called 'Khumasdar'. It is about food & recipes of different tastes. The recipes are mostly traditional in our area. So enjoy the the blog & share views. Thank you. 

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

DIWALI MAGAZINE PUBLISHED...

8/11/15


 Happy Diwali To All.   


Published This Years Diwali Ank from SATYAVEDH Magazine. It contains Stories, poems, Book reviews & many more readable material. In this issue we have taken articles from writers who wrote particularly on rural issues like social problems, water problem, situation of farmers, rural youth etc. To read this interesting Diwali issue Please contact us.सोमवार, २० जुलै, २०१५

Published Two New Books. * श्रावणसर * काव्यांजली .

20/7/2015 Monday.

                     Published Two New  Books. * श्रावणसर  * काव्यांजली . 

 Just Published two new books by our Publishing house "Satyavedh Publishing" .
Two books are collection of poems by local  literary scholars. Both books contain very nice poems & these books are available on bookganga.com  site in few days as well as in our office. So those who love poems & literature must check out these books. They are affordable. It is our effort  to give encouragement to new writers to write & we will publish their work. Many times those who are fond of writing don't know how to publish their valuable writing so our Publishing house is there to help you. If you have literature work & want to let world know your talent do not hesitate contact us.

In next few days we are going to publish few more books at that time we will let you know about it.

बुधवार, १ जुलै, २०१५

भाजणीचे खमंग वडे .

१/७/२०१५

भाजणीचे खमंग वडे . 
साहित्य -
* २ वाट्या थालीपिठासाठी तयार केलेली भजणी .
* २ चमचे तिखट .
* १ चमचा तीळ .
* १ चमचा धने - जिरे पावडर .
* २ चमचे तेल .
* हळद
* ओवा
* मीठ
* २ चमचे तेल
* तळायसाठी तेल .
कृती  - वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ चांगले मळून घ्यायचे . नंतर त्याचे वडे थापून  गरम तेलात चांगले खमंग तळायचे . हे वडे दह्या बरोबर खायला छान लागतात .  

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

माहिती .

२८/२/१५.
 नुकतेच 'सत्यावेध प्रकाशन' चे पहिले पुस्तक प्रकाशीत झाले . हे पुस्तक खाजगी वितरणासाठी होते .  या आधी ५ वर्षे मासिक चालू आहे . मासिक सत्यावेध या नावाने .
 त्याचा फेब्रुवारीचा कॅन्सर विशेष अंक प्रकाशीत झाला . या अंकात कॅन्सर बद्दल सर्व माहिती व त्याच्या वरील उपचार , कारणे , हॉस्पिटल्सची माहिती , जाणकार डॉक्टरांचे लेख  तसेच या आजारातून बरे झालेल्या  लोकांचे  अनुभव असा माहितीपूर्ण अंक आहे . हा अंक करताना बरीच माहिती मिळाली . तसेच कॅन्सर बद्दलचे असलेले बरोबर -चुकीचे समज , शंका दूर होण्यास मदत या अंकातील लेखांमुळे होईल . आमच्या भागात याबद्दल कार्य करणाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .हा अंक वाचनीय व संग्राह आहे .
मार्चचा  अंक महिला दिन विशेष अंक आहे . त्यात विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या महिलांची माहिती व लेख असणार आहेत . या विषयी अधिक माहिती पुढच्या पोस्ट मध्ये.
********************************************************************************

नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्
नष्टा विद्या लभ्यतेsभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ||

- गेलेले धन कष्ट करून परत मिळविता येते. गेलेली विद्या (अज्ञान) अभ्यास करून प्राप्त करता येते.  नष्ट झालेले आरोग्य चांगल्या उपचारांनी परत मिळते पण एकदा जी वेळ गेली ती गेलीच.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

हंपी - प्रवास एका साम्राज्याचा .

16/11/14.
                              हंपी - प्रवास एका साम्राज्याचा .
                               
                     


आता आम्हाला जे पहायची प्रचंड उत्सुकता हाोती त्या विठ्ठल मंदिराकडे निघालो. युनेस्कोनं जेव्हा हंपीचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केला तेव्हापासून इथल्या परिसरात खूप सुधारणा झालेल्या दिसत होत्या. प्रत्येक वास्तुतील नैसर्गीक सौदर्य अबाधीत ठेऊन जेवढी शक्य आहे तेवढी डागडुजी केलेली दिसत होती. विठ्ठल मंदिराच्या बाबतीतही युनोस्कोच्या लोकांनी ही काळजी घेतलेली दिसत होती. प्रायव्हेट गाड्या मंदिरापासून साधारण एक किलोमीटर दूरवर थांबवून सर्वांना बॅटरीवर चालणार्‍या गाडीतून मंदीराकडे नेलं जात होतं. आम्हीही अशाच एका गाडीत बसलो आणि मंदीराकडे निघालो. मंदीराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबलचक दुकानगाळे असल्यासारखं बांधकाम दिसत होतं. ती त्याकाळची बाजारपेठच होती. पण ह्या बाजारपेठेत हिरे, माणीक,मोती अशा रत्नांची खरेदी विक्री होत होती. अशी मौल्यवान माहिती आम्हाला गाईडकडून मिळाली. एव्हाना आम्ही मंदीराच्या मुख्य प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताच आम्हाला प्रथम दगडी रथ दिसला. ह्या दगडी रथाविषयी खूप वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वाचायला मिळालं होत. फोटोतून, फिल्ममधून हा रथ बघीतला ही होता. पण हापूस आंब्याच चित्र पहाणं आणि प्रत्यक्षात आंबा खाणं ह्यात जो फरक आहे ना तोच फरक ह्या रथाच चित्र पहाणं आणि प्रत्यक्ष रथाजवळ उभं राहून त्यावर केलेल अव्दितीय कोरीवकाम बघणं ह्यात आहे.  विठ्ठल मंदिराच्या दारातच दोन्ही बाजूला एका मोठ्या खांबात सात छोटे छोटे खांब बसवलेले होते. त्या खांबातून चक्क सा रे ग म प ध नी सा हे सप्तसूर वाजतात असं आम्हाला गाईडनं सांगीतलं. पूर्वी ह्या खांबांवर वाजवून हे सूर पर्यटकांना ऐकवले जात होते पण सतत त्यावर आघात झाल्यामुळं ह्या खांबांची झीज होऊ लागल्याचं लक्षात आल्यावर त्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या भोवती बरेच खांब होते,आत मध्यभागी सभामंडप होता. प्रत्येक खांबावर वेगवेगळी वाद्य वाजणार्‍या वादकांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. आणि त्या त्या खांबातून त्यावर कोरलेल्या वाद्याचा आवाज येत असे! हे ऐकल्यावर माझा माझ्याच कानावर विश्‍वास बसेना. पण शेजारी असलेल्या दुसर्‍या एका मंदीराच्या खांबावर आमच्या गाईडनं हातानं आघात केल्यावर त्यातून तबल्याचे बोल ऐकू आले. मग मला ह्या चमत्कारावर विश्‍वास ठेवावाच लागला. भरीव अशा दगडी खांबातून जर सप्तसूर उमटू शकतात तर खांबातून नरसिंह प्रकटला हे सुध्दा खरं असू शकेल असा विचार माझ्या मनात उगाचच चमकून गेला. देवळाच्या भिंतीवर केलेलं कोरीवकाम बारकाईनं बघत असताना आम्हाला काही प्रसंग कोरलेले दिसले. अरबी,पर्शियन तसेच पोर्तुगीज लोक राजाला वाकुन नमस्कार करत आहेत असा एक प्रसंग होता. हे परदेशी लोक व्यापारासाठी इथे आले होते असं म्हणतात. त्या काळीसुध्दा वस्तुंची आयात निर्यात होत होती हे यावरून लक्षात आलं. वियजनगरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या विजय विठ्ठल मंदीरात घटकाभर बसून आम्ही महानवमी डिब्बा बघायला निघालो. महानवमी डिब्बा म्हणजे 22 फूट उंच आणि 80 फूट लांब व साधारण तेवढाच रूंद असलेला भला मोठा चौथरा होता. ह्या चौथर्‍याच्या समोर मोठं पटांगण होतं. राजा कृष्णदेवराय यांनी ओरीसाची मोहिम फत्ते केल्यावर त्याच्या स्मरणार्थ हा महानवमी डिब्बा बांधला असं म्हणतात. ह्यावर बसून राजा स्वत: विजयादशमीचा सोहळा बघत असे. अशी माहिती आम्हाला सांगण्यात आली. आजही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या हंपी उत्सवाचं आयोजन येथे केलं जात या उत्सवाला देशविदेशातून येणारे हजारो पर्यटक हजेरी लावून जातात.
  लवकरच सूर्यास्त होणार होता. आम्ही सर्वजण महानवमी डिब्बाच्या चौथर्‍यावर जाऊन बसलो. वर गेल्यावर राजवाड्याचा बराच परिसर दृष्टीक्षेपात येत होता. राजवास्तूंची नुसती फाऊंडेशन तेवढी उरली होती. ऐकेकाळी त्यावर चंदनाच्या लाकडापासून केलेल सुंदर बांधकाम होतं. पण बहामनी राज्यांच्या जेव्हा स्वार्‍या झाल्या तेव्हा त्यांनी ते सरळ पेटवून दिलं. देवळांची देवळातल्या मूर्त्यांची मोडतोड केली आणि अनेक शिल्प काळाच्या उदरात गडप झाली अशी माहिती गाईड सांगत होता. गाईडचे शब्द माझ्या कामावर पडत होते पण मला ऐकू येणारा आवाज मात्र वेगळाच होता. अचानक कोरड्या पडलेल्या पुष्करणींमधून विशिष्ट नाद करत नर्तन करणारी कारंजी मला दिसू लागली. तलावात नाना विविध रंगांची कमळ उमललेली दिसू लागली. उत्तम लाकडी कलाकुसर असलेले भव्य राजवाडे, मखमली गालीचे, वेगवेगळ्या रंगांची आणि आकाराची झुंबर,मंजुळ संगीताचे स्वर,उंची अत्तराचा सुगंध,राजवस्त्रांची सळसळ,दुरवर कुठल्यातरी मंदीरात चाललेला सांजआरतीचा आवाज आणि त्याबरोबर होणारा धीरगंभीर घंटानाद हे सगळ मी अनुभवत असतानाच And Hampi ruins, हंपी लयाला गेले असं गाईडचे शब्द माझ्या कानावर पडले आणि मी भानावर आले. सूर्य जवळपास अस्ताला गेला होता. अंधार पडायच्या आत आम्हाला हंपीतून बाहेर पडावं लागणार हों. आम्ही गाडीत बसलो, गाडी सुरू झाली जाता जाता मी एकदा मागं वळून बघीतलं. का कुणास ठाऊक आकाशात चंदनाच्या धुराचं मळभ दाटल्यासारख्या वाटत होत. हंपीमध्ये कुणी काय बघीतलं माहित नाही पण काही क्षणांसाठी का होईना माझ्या मन:चक्षूंनी त्यावेळचं राजवैभव नक्कीच बघीतलं! मैत्रिणींनो तुम्हीसुध्दा जरूर एकदा हंपी बघा पण तुमचे मन:चक्षु उघडे ठेऊन!!!!
**************************************************************